Breaking News

मानव प्रतिष्ठाणचे सामाजिक कार्य कौतुकास्पद

पाथर्डी, दि. 21 - पाथर्डी तालुक्यातील मानवसेवा प्रतिष्ठाणने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना श्रीराम संस्कार केंद्राच्या माध्यमातून आध्यात्मिक धडे, गरीब अनाथ विद्यार्थ्यांना निवारा केंद्र, विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन हे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पाथर्डीच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रज्ञा म्हांडुळे यांनी केले. 
जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत व्यायाम शाळा बांधकामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पंढरपूर येथील अनंता महाराज तनपुरे, जि.प. सदस्या सौ. उषाताई कराळे, जि.प. सदस्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मोहनराव पालवे, वृद्धेश्‍वर तालुका दूध संघाच्या चेअरमन मीराताई वांढेकर, देविदास वांढेकर, मोहजचे सरपंच सौ. अलका वांढेकर, दूध उत्पादकांचे नेते, जे. बी. वांढेकर, युवानेते रामकिसन वांढेकर, माजी सरपंच श्रीकृष्ण वांढेकर, अँड़ वांढेकर, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पाचे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक बाबाजी गोडसे, उपजिल्हा क्रीडा अधिकारी श्री.वीर,अँड़ महेश शिंदे, सुखदेव वांढेकर, बाळासाहेब वांढेकर, गहिनीनाथ खाडे, विठ्ठल राजळेंसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. मानवसेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील मतकर यांनी संस्थेची माहिती दिली. बाळासाहेब मतकर यांनी आभार मानले.