श्रमिकनगरला अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप
अहमदनगर, दि. 19 - श्रमिकनगर येथे श्रमिक बालाजी सामाजिक संस्था व श्री बालाजी महिला मंडळाच्या वतीनेे श्रीरामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे मंदिरात आयोजन करण्यात आले होते. 8 दिवस चाललेल्या या सप्ताहात आयोजित कीर्तन व प्रवचनास, तसेच दैनंदिन धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा चांगल प्रतिसाद लाभला.
श्रीरामनवमीदिनी हभप जनार्दन माळवदेमहाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी नगरसेविका वीणा बोज्जा, माजी नगरसेवक धनंजय जाधव, श्रीनिवास बोज्जा, विनोद म्याना, शंकर येमूल, दत्तात्रय कुंटला, लक्ष्मण आकुबत्तीन आदींसह भाविक उपस्थित होते.
हभप जनार्दन माळवदेमहाराज म्हणाले की, मानवाच्या जडणघडणीत बालवयापासूनच योग्य आचरण आणि संस्कार झाले, तरच त्यात सेवाभाव, सेवावृत्ती जोपासली जाईल. सेवावृत्ती स्वआचरणात येऊ शकते. नुसते दुसर्याला दाखले देण्यापेक्षा प्रथम स्वतः कृती आचरण करावे. स्वतःपासून समाजकार्यास सुरुवात केल्यास समाजही तुमच्या या कार्यात सहभागी होऊन सामूहिक भावना निर्माण होईल. हाच कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. कीर्तन व प्रवचनाच्या श्रवणाने आपले जीवन अधिक आनंदी व समाधानी बनते. चांगले विचार समाजात रुजविण्याचे काम धार्मिक कार्यक्रमांतून होते, असे ते म्हणाले.नगरसेविका वीणा बोज्जा म्हणाल्या की, आठ दिवस आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन व प्रवचनामुळे परिसरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला, असे ते म्हणाले.