राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रंजना उर्किडे
अहमदनगर, दि. 19 - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी रंजना उकिर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र नुकतेच आमदार संग्राम जगताप व महिला जिल्हाध्यक्षा सौ. रेश्मा आठरे यांच्या उकिर्डे यांना प्रदान करण्यात आले आहे.
यावेळी महापौर अभिषेक कळमकर, राजश्री मांढरे, शाहीन शेख, सुरेखा भिंगारदिवे, सारंग पंधाडे, जय भोसले, अभिजीत खोसे, राजेश आठरे आदिसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध प्रश्न सोडविण्यात घेतलेला पुढाकार सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रंजना उकिर्डे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवून महिलांचे, तसेच समाजातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू तसेच शहरातील अनेक प्रश्न असल्याने ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रंजना उकिर्डे यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे आ. अरुण जगताप, माजी आ. दादाभाऊ कळमकर, महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक संपत बारस्कर, अविनाश घुले, सभागृहनेते कुमारसिंह वाकळे आदींसह वरीष्ठ पदाधिकार्यांनी सौ.रंजना उर्किडे याचं अभिनंदन केले आहे.