जलयुक्त अभियानात यंदा कंपार्टमेंन्ट बंडिंगवर भर
अहमदनगर, दि. 20 - टँकरमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पाने प्रेरित झालेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसर्या वर्षात यंदा प्राधान्याने कंपार्टमेंटन्ट बंडिंगवर अधिक लक्ष केेंद्रीत करण्यात आले आहे. जमिनीतील सुपिक माती जागेवरच थांबावी, पोत टिकून रहावा, म्हणून शेत जमिनिला उतरावरतील 1 बाय 1 बाय 1 चे चर खोदून बांध बंदीस्तीची कामे केली जाणार आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत कंपार्टमेंट बंडिंगचे लक्ष दुप्पट करण्यात आले असून, जलयुक्तसाठी निवडण्यात आलेल्या जिल्हयातील 268 गावात 1 लाख 7 हजार 218 हेक्टरवर कंपार्टमेंन्ट बंडिंंगचे कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी 89 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत असून या कामाचे अराखडे तयार करण्यात आले असल्याची महिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानात गेल्यावर्षी जिल्हयातील 279 गावांचा समावशे करण्यात आला होता. यंदा एकूण 268 गावात हे महत्वकांक्षी अभियान राबविले जाणार आहे. प्रामुख्याने सर्व शासकीय यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नावर भर देतानाच स्थानिक पातळीवर लोक सहयोगही जलयुक्तसाठी महत्त्वाचा आहे. गावाच्या शिवरात जलस्तर वाढवुन गावे जनसंपन्न व्हावी यासाठी ही योजना संकल्पीत आहे.
प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे यांनी बोलताना सांगितले की, कंपार्टमेंट बंडिंगचा खर्च 6 हजार 900 आहे. एका गावात सरासरी 400 हेक्टरवर कंपार्टमेंन्टचे काम होईल. साधारणपने अपेक्षीत पाऊस झाल्यास पाच वेळा पाणी मुरल्यास जलस्तर निश्चित वाढेल.