शिर्डीतील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला
राहता, दि. 19 - शिर्डी हे श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी झालेले शहर.! रोज हजारो साईभक्त श्री साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात, आलेल्या प्रत्येक साईभक्तांना व शिर्डीच्या प्रत्येक नागरिकांना सुविधा देणे शिर्डी नगरपंचायतीस क्रमपात्र आहे.
या वर्षी उन्हाळ्यात उष्णतेची दाहकता भयंकर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ स्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचेही सध्या दुर्भिक्ष झाले आहे . यात शिर्डी शहरात पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याच अनुषंगाने चालू वर्षी उन्हाळ्यात शिर्डीच्या नागरिकांना व साईभक्तांना पाण्याची कमतरा भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाने शिर्डी नगरपंचायतीस एप्रिल महीन्यात पाण्याचे आवर्तन द्यावे यासाठी पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता तसेच प्रांताधिकारी श्री कुंदन सोनवणे साहेब यांच्याकडे नगराध्यक्षा मा.सौ.अनिताताई जगताप यांनी वारंवार पाठपुरावा केला. यास पाटबंधारे विभागाने तसेच प्रांताधिकारी श्री कुंदन सोनवणे साहेब यांनी सहकार्य केले व शिर्डी नगरपंचायतीचा तिस एक्कर क्षेत्र परिसरात असलेल्या साठवण तलाव हा पुर्ण क्षमतेने भरला.
यामुळे भर उन्हाळ्यात 03 महिने शिर्डीच्या नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून साठवण तलावाची गळती होत आहे, मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते, ह्या सर्व बाबी समजावून घेण्यासाठी नगराध्यक्षा सौ.जगताप यांनी अचानक साठवण तलावास भेट दिली. यावेळी शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री धैर्यशिल जाधव साहेब हे ही उपस्थित होते, यावेळी नगराध्यक्षांना माहिती देतांना मुख्याधिकारी श्री जाधव साहेब यांनी सांगितले की नगरपंचायतीच्या साठवण तलावाची किरकोळ दुरूस्ती चालू आहे, लिक असलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती पुर्णपणे करण्यात आली आहे, तळ्याच्या आसपास असलेल्या 30 विहीरींचे अधिग्रहण आपल्या सांगण्यावरून करण्यात आले आहे तसेच त्या विहीरींचा विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. व या सर्व घटनेवर लक्ष देण्यासाठी एक विषेश पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे असे मुख्याधिकारी श्री धैर्यशिल जाधव यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सौ. मंदाताई गुंजाळ नगरसेवक श्री सुरेश आरने श्री किरण बर्डे मुख्याधिकारी श्री धैर्यशिल जाधव साहेब तसेच पत्रकार श्री सुनिल दवंगे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा मा. सौ. अनिताताई जगताप यांनी राज्यात भयंकर दुष्काळ आहे यामुळे शिर्डी शहरातील नागरीकांनी पाण्याची बचत करावी पाण्याचा अपव्यय टाळावा असे अवाहन नगराध्यक्षा सौ जगताप यांनी नागरिकांना केले. तसेच शिर्डी नगरपंचायतीचा साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरला यासाठी नगराध्यक्षा सौ.अनिताताई विजयराव जगताप यांनी प्रांताधिकारी, पाटबंधारे विभाग व शिर्डी नगरपंचायतीच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानले.