चारा छावण्या-कुकडी आवर्तनासाठी रास्तारोको
श्रींगोदा, दि. 19 - कुकडीच्या आवर्तनातून सर्व बंधारे आणि पाण्याचे उद्भव भरून द्यावेत यासह चारा छावण्या सुरु करावे यासाठी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली घारगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आज सकाळी घारगाव येथे आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलनात करण्यात आले यावेळी आंणासाहेब शेलार, प्रा.तुकारम दरेकर, बाळासाहेब नाहटा, हरीदास शिर्के, ऋषीकेश गायकवाड, बापूराव सिदनकर, भाऊ खेतमाळीस, शरद कुदांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. राहुल जगताप म्हणाले की अधिवेशन काळात कुकडी आणि घोडच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा छावण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, पालकमंत्री राम शिंदे, यांना वारंवार भेटून पत्रव्यवहार केला तरीही श्रीगोंदा - नगर तालुक्यात आजपर्यंत एकही चारा छावणी सुरु झाली नाही. मुख्यमंत्री सांगतात छावण्यांचा आदेश देण्यात आला आहे. परंतु आमचेकडे अद्याप छावण्या सुरु करण्यात आल्या नाहीत. छावणीसाठी 500 जनावरांची अट घालण्यात आलेली आहे. जर 500 जनावरे नसतील तर छावणीच सुरु करता येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दिलेले टंकरचे प्रस्ताव पडून आहेत. गावातील सगळेच पाण्याचे स्त्रोत 3 - 4 कि. मी वर एखंद्या बोरवेलला पाणी असेल तर तहसीलदार अधिग्रहण प्रस्ताव प्रांतांना पाठवत आहेत. प्रांत त्यामुळे टकर प्रस्ताव मान्य करत नाहीत. अशा अधिकार्यांना 5 - 6 कि. मी वरून पाणी आणायला सांगा म्हणजे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या हालअपेष्टा कळतील.
पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले असताना महिनाभर पुरेल इतका चारा शिल्लक आहे हे नक्की कुणाच्या सुपीक डोक्यातून निघालेला अहवाल आहे हेही तपासणे गरजेचे आहे. तसेच वरील सर्व परिस्थितीचा गंभिरर्याने विचार करून श्रीगोंदा - नगर तालुका तेथे गावनिहाय चारा छावण्या सुरु कराव्यात. तसेच येणार्या आवर्तनातून 1 टी. एम. सी पाण्याचे वाढीव रोटेशन मिळावे त्यामुळे फळबागांना पाणी देता येणार असून फळबागा वाचविण्यास मदत होईल असे ते म्हणाले.