रामनामाच्या जयघोषाने दुमदुमली माकोडी
बुलडाणा, दि. 19 - श्रीराम जय राम जय जय रामचा जयघोष, भगव्या पताकाधारी भाविक, अश्व अन् रामरथासह श्री क्षेत्र माकोडी येथे प्रभुरा
मचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी नगर परिक्रमा काढण्यात आली. समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराजांसह भाविकांनीही याप्रसंगी फुगड्यांचे फेर धरत आनंदोत्सव साजरा केला.
श्री क्षेत्र माकोडी येथे दरवर्षी प्रमाणे राम नवमी निमित्त चैतन्यमंदिर परिसरात भाविकांची मादियाळी जमली होती. पहाटे काकड आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता आकर्षक सजवलेल्या रामरथासह माकोडी नगरीतुन शोभायात्रा काढण्यात आली. महिला भाविकांनी परिक्रमा मार्गावर सडासारवन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. याप्रसंगी रामरथात विराजमान प्रभु श्रीरामांच्या मुर्तीच्या दर्शनाचा लाभही भाविकांनी घेतला. श्रीरामप्रभुंचा जयघोष करत भाविकांनी फुगड्यांचे फेर धरले. तसेच उत्तरप्रदेशातील नैमीष्यारण्यातुन आलेल्या कुलदीप कुमार त्रीपाटी यांच्यासह भाविकांनी भजनसेवाही दिली. त्यानंतर दुपारी श्रीराम जन्मोत्सव चैतन्यमंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी पाळणा म्हणुन श्रीराम जन्माचे स्वागत केले. देव हा अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामातच खर्याअर्थाने कृपेचा वर्षाव असल्याने नित्यनियमाने प्रभुश्रीरामाच्या नामजपाचा आग्रह प्रत्येकाने धरावा. निश्चितच जीवनाचे कल्याण होईल, असेही यावेळी समर्थ श्रीहरी सद्गुरु महाराजांनी सांगितले. 16 एप्रिलला महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.