तुम्ही नोकरी करत नसून, सेवा करत आहात : मोदी
नवी दिल्ली, दि. 21 - प्रत्येक अधिकार्यांनी नागरिकांचा विश्वास वाढविणे गरजेचे असून, केवळ प्रशासक व नियंत्रक बनून उपयोग नाही तर नागरिकांसाठी चांगले काम करायला हवे. तुम्ही केवळ नोकरी करत नाहीत, तर तुम्ही देशाची सेवा करत आहात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये गुरूवारी नागरी सेवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिका़र्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘अधिका़र्यांनो तुम्ही नोकरी नाही तर सेवा करत आहात. नागरिकांसमोर येणा़र्या अडचणी दूर करायला हव्यात. नागरिकांचा विश्वास वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या बदलासाठी काम करायला हवे. बदलामुळे देशातील 125 कोटी नागरिकांची शक्ती देशाला उंच ठिकाणी घेऊन जाईल.सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही बदल घडणार नाही. तुम्ही बदल केला नाही तर देशात बदल घडणार नाही. बदल घडविण्यासाठी चांगली कामगिरी करणा़र्यांना यावेळी स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय, जन धन सारखे सरकारी कर्मचा़र्यांना पुरस्कार दिले जातील, असेही मोदींनी सांगितले.