Breaking News

भाजप मंत्र्यासाठी पुन्हा पाण्याची नासाडी

मुंबई, दि. 21 - केंद्रीय मंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी हजारो लिटर पाण्याची नासाडी केल्यीची पुनरावृत्ती घडल्यामुळे भाजप मंत्र्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भिवंडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्री
य मंत्री राधामोहन सिंग आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय करण्यात आला.
राज्यातील महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा दुष्काळावरील सेल्फी असो, किंवा एकनाथ खडसेंच्या दौर्‍यात झालेल्या पाण्यीची नासाडी असो यातून प्रत्यक्ष कामापेक्षा भाजप सरकार आणि सरकारमधील मंत्री झगमगाटी दोरे आणि लोकप्रियतेला अधिक महत्व देत असल्याचे समोर येत आहे.
दुष्काळाबाबत केवळ नावाला चिंता व्यक्त करत, प्रत्यक्षात मात्र आपला बडेजावपना मिरवत बेजबाबदार वर्तन करायची असाचा काहीसा हा प्रकार असल्याचे टीका आता सर्वसामान्य नागरीक करू लागले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह हेलिकॉप्टरने येणार असल्याने त्यांच्यासाठी हेलीपॅड तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे ठाणे जिल्हयात पाणी टंचाईमुळे काही भागात तर आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. पाणी समस्येने उग्ररूप धारण केल्याने 60 टक्के पाणी कपात सुरु आहे. मे महिन्यात हीच पाणी कपात 70 ते 75 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्य सरकार ते स्थानिक स्वराज्य संस्था पाणी वाचवा म्हणून जनजागृती करीत आहे. मात्र, याच सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना राज्यात पडलेल्या दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.