भारताचा अमेरिकेबरोबरील करारामुळे चीनचा तीळपापड
बीजिंग, दि. 18 - अमेरिकेबरोबरील संवेदनशील लॉजिस्टिक्स एक्सचेंज करार करण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारत व अमेरिकेमधील अविश्वासाच्या वातावरणामुळेच हा करार अद्यापी रेंगाळला असल्याचा दावा ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्रामधील या लेखामध्ये करण्यात आला आहे. याशिवाय अमेरिका व चीन या दोन्ही देशांसह सर्वांनीच आपली मनधरणी करावी, अशी भारताची इच्छा असल्याचा आरोप या लेखामध्ये करण्यात आला आहे.