Breaking News

पीएमटीच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

पुणे, दि. 18 - तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) सोमवारी सकाळी पीएमपीएमएलच्या बसने उडवल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे हेल्मेट घातलेले असतानाही अपघातानंतर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर खूप वेळाने घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल होऊन त्यानंतर संबंधित मुलीला रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. सुप्रिया सोपान शिळमकर असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे.