Breaking News

लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम

पारनेर, दि. 19 - करंडी (ता. पारनेर) प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल करण्यात आली. दत्तात्रय ठाणगे यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
करंडी येथे जिल्हा परिषदेची 1 ली ते 7 वी पर्यंतची शाळा भरते. मुलांना अद्ययावत शिक्षण मिळावे म्हणून भूमिपुत्रांनी पुढाकार घेतला. कवी साहेबराव ठाणगे, विठ्ठल ठाणगे व अनिल धुमाळ यांच्या देणगीतून तीन एलईडी, इन्व्हर्टर संच, स्पिकर सेट देऊन डिजिटल क्लासरूम प्रत्यक्षात साकार झाले. तसेच मळगंगा युवा प्रतिष्ठानच्यावतीने शाळेला 20 झांज व 20 लेझीम भेट देण्यात आले.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले, सरपंच वैशाली उघडे, उपसरपंच सुनील ठाणगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिजाभाऊ थोरात, भास्कर गव्हाणे, मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर ठाणगे, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.