जिल्ह्यात व्यापक पातळीवर हरीत सातारा अभियान : सयाजी शिंदे
सातारा, दि. 21 - सातारा जिल्ह्यातील वनसंपदा कमी होत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. झाडांना महत्त्व असतानाही त्यांच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात व्यापक पातळीवर हरीत सातारा अभियान राबवणार असल्याची ग्वाही सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडांवर देशी झाडांच्या बिया संकलित करुन त्या रुजवणार असल्याचे जिल्हा कृषि अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी सांगितले.
सयाजी शिंदे म्हणाले आपल्या पूर्वजांनी झाडे लावली. मात्र त्यानंतर आपणाला या कार्याचा विसर पडला. झाडांचे अनेक फायदे असतानाही आपण वृक्ष लावगवडीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही. आजही ग्रामीण भागात मोठी झाडे दिसतात.
नव्याने लागवड केलेल्या झाडांची संख्या नगण्य आहे. विशेषत: ग्रामीण भागातून नामशेष होत चाललेल्या देशी झाडांची पुन्हा जोपासणा केली पाहिजे. आंब्यामध्ये शेंद्री, खोबरी, गोटी, कागदी, नारळी, केसरी, गाडगी इत्यादी जाती होत्या. अशा आंब्याची कोय गोळा करुन त्यापासून आम्हाला दुर्मिळ अशा आंब्यांच्या जाती निर्माण करता येतील. तसेच पक्षांना आकर्षिक करणारी काटे शेवर लावूनही पर्यावरणाचा समतोल राखता येईल. याशिवाय पांगिरा, पळस, साधी बाभूळ, वड, पिंपळ, कडूनिंब, करंज इत्यादी स्थानिक मातीत येणारी आणि पाण्याशिवाय तग धरुन राहणारी झाडे लावता येतील. झाडांच्या बिया गोळा करण्याचा कार्यक्रम शाळा तसेच महाविद्यालयांत राबवून पावसाळयाच्या तोंडावर या बिया उजाड डोंगर आणि बोडक्या टेकड्यांवर टोकल्या तर त्या जमिनीत रुजतील.
अंगच्या बळावर निर्माण होणारी ही रोेपे वाढतील. दहा वर्षात जिल्ह्याचे रुपडे पालटून जाईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावे असेही आवाहन त्यांनी केले. त्यांनी सादर केलेल्या ’कत्तलखाना’ कवितेला उपस्थितांनी दाद दिली.
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे म्हणाले करवंद, चिंच, जांभूळ, हिरडा, बेहडा, नांदुख, शेवगा, पिंपरद इत्यादी देशी झाडांना महत्त्व आहे. कमी पाण्यात हे वृक्ष मोठे होतात. पर्यावरणाच्या दृष्टिने या झाडांना खूप महत्त्व आहे. अशा वृक्षांच्या बिया संकलनाचे काम तालुका पातळीवर कृषी सहायकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात अशा वृक्षांच्या बिया सहजगत्या उपलब्ध होतील. शहरी भागातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ज्या ठिकाणी अशा बिया मिळतील तेथून त्या उपलब्ध कराव्यात असे आवाहन केले. यावेळी कृषि उपसंचालक गुरुदत्त काळे उपस्थित होते.