दूषित पाण्याने कृष्णा नदीतील मासे मृत
सातारा, दि. 21 - गतवर्षात अल्प प्रमाणातील पर्जन्यमानामुळे धोम धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिला आहे. परिणामी कृष्णा नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला आहे. फक्त गावाशेजारी असणार्या डोहात थोड्या फार प्रमाणात पाणीसाठे असून त्यातही मैलामिश्रित पाणी मिसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मासे मृतावस्थेत आढळत आहेत. त्यामुळे नदी
काठी परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
या वर्षीच्या उन्हाळ्यातील उष्णतेचा पारा अंशांवर असल्याने त्याचा सामना नागरिकांबरोबरच जनावरे, जलचरांना करावा लागत आहे. उष्णतेमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होत आहे. त्याचे विपरीत परिणाम नदीतील मासे व इतर जलचरांवर होत आहेत. उन्हाळा तीव्र होत आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावू लागली आहे. वाई तालुक्यातून वाहणार्या कृष्णा नदीचा प्रवाह बंद पडून पात्र कोरडे ठणठणीत झाले आहे. पाण्याचा अल्पसाठा, मैलामिश्रित पाणी आणि उन्हाळ्याची प्रचंड प्रमाणात वाढलेली दाहकता यामुळे मासे मृत्यमुखी पडत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून भुईंजनजीक कृष्णा नदीतील मासे मृत होऊन काठावर पडत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीकाठी मृत झालेले मोठे मासे काही मासेमारी करणारे गोळा करीत असून ते बाजारपेठेत विकण्यासाठी घेऊन जात आहेत. हे मृत मासे खाण्यात आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.