लोणंदमध्ये माऊलींचा एक दिवस मुक्काम
लोणंद, दि. 21 - श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा यंदा लोणंदनगरीत एक दिवसाचा म्हणजे 5 जुलै रोजी मुक्काम राहणार असून पालखी आळंदीहून पंढरपूरकडे दि. 28 जून रोजी प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात एकूण चार मुक्काम होणार आहेत.
माऊलींच्या पालखी सोहळा विठ्ठलाच्या भेटीसाठी दरवर्षी आळंदीहून पंढरपूरकडे जात असतो. यावर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दि. 28 जून रोजी आळंदीहून प्रस्थान होणार आहे. यावर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यात पाच मुक्काम, सातारा जिल्ह्यात चार मुक्काम तर सोलापूर जिल्ह्यात सहा मुक्काम असणार आहेत. लोणंद या ठिकाणी असणारे दोन मुक्काम न होता यावर्षी एकच मुक्काम होणार आहेत. याशिवाय तरडगाव, फलटण, बरड असे मुक्काम होणार आहेत.
माऊलीच्या पालखी सोहळ्याचे दि. 5 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून याच दिवशी दुपारी 2.30 च्या सुमारास माऊलींच्या पादुकांना निरा नदीत निरास्नान घातले जाणार आहे. दि. 5 जुलैच्या लोणंद मुक्कामानंतर दि. 6 रोजी पालखी सोहळा दुपारी 1 वाजता रवाना झाल्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास लोणंद-फलटण रोडवर तरडगाव जवळील चांदोबाच्या लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे.