परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाला हिरवा कंदील
बीड, दि. 19 - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ या तीर्थक्षेत्राचा अन्य तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्या साठी परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात यावे व यासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली.
या साठी आपण अत्यंत सका
रात्मक असल्याचे सांगुन न.प. ने तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे कृती आराखडा सादर करावा या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. धनंजय मुंडे यांना दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करून विकास कामे केली जातात. परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे.देशाच्या कानाकोप-्यातून लाखो भाविक ज्योतिर्लिंग दर्शनासाठी या ठिकाणी येतात. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त येथे मोठा यात्रा महोत्सव असतो. याबाबत ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहितीचे निवेदन देण्यात आले. राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर परळी वैजनाथ या ठिकाणी परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात यावे व यासाठी भरीव तरतूद करावी अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यां कडे केली. यावेळी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनीही या बाबत निवेदन सादर केले.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची नितांत आवश्यकता असून न. प. च्या वतीने दरवर्षी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. लाखो भाविकांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, दळणवळण, भक्तनिवास, रुग्णालय, उद्याने विकसित करणे, वाहनतळ, यात्रा भरविण्यासाठी कायमस्वरूपी जागा, विविध तीर्थ विकास, प्राचीन व धार्मिक स्थळांचे जतन व विकासकामे , वैद्यनाथ मंदिर व परिसरातील विकास कामे,अन्य मंदिरे व स्थळांचे सुशोभीकरण, रस्ते विकास आदी सर्वांगीण विकासासाठी परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करुन या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास होईल त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा व भरीव तरतूद करण्यात यावी अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. यावर आपण अत्यंत सकारात्मक असल्याचे सांगुन मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला. परळी नगर परिषदेने तातडीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे कृती आराखडा सादर करावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन त्यांनी ना. धनंजय मुंडे यांना दिले. तसेच अर्थिक तरतुदीसाठी अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना भेटून घेण्याची ही सुचना केली. या वेळी परळीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह रा. कॉ.चे सरचिटणीस प्रताप देशमुख, युवक नेते अजय मुंडे, अभय मुंडे, प्रणव परळीकर आदी उपस्थित होते.