Breaking News

मनपा पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या भांगरे विजयी

अहमदनगर, दि. 19 - महापालिकेच्या प्रभाग तीनच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा विजय भांगरे या 348 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णा गाकयवाड यांचा पराभव केला. भांगरे यांना 2601 मते तर

गायकवाड यांना 2253 मते मिळाली. अपक्ष उमेदवार अनिता दहवी यांना अवघी 35 मते मिळाली असुन त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
प्रभाग 3 मधून डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत सेनेचे विजय भांगरे निवडुन आले होते. मात्र, 11 जानेवारी 2016 रोजी त्यांचे निधन झाले. सदर ठिकाणी पुन्हा पोटनिवडणुक घेण्यात आली. या निवडणूकीत सेनेने कै.भांगरे यांची पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने कृष्णा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. रविवारी झालेल्या निवडणुकीत एकूण मतदारापैंकी फक्त 4962 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोमवारी सकाळी 10 वाजता जुन्या मनपा कार्यालयात मतमोजनी झाली. 9 केंद्रापैकी 7 केंद्रावर सेनेच्या उमेदवार आघाडीवर राहिल्या. निवडणुक निर्णय अधिकारी
म्हणून अजय चारठणकर यांनी काम पाहिले. अवघ्या 58 मिनाटामध्ये निवडणुक निकाल प्रक्रिया पार पाडण्यात आली. निकाल जाहिर होताच सेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रा बाहेर जल्लोष केला. त्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्या शिवालय येथे गेले. तेथुन प्रभाग तिन मध्ये उमेदवारासह मिरवणुक काढण्यात येवून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. रॅली पंचवटी नगरपरिसरात आली असता सेना व राष्ट्रवादीचे दोन्ही गट समोरा समोर आल्याने दोन्ही गटात शिवीगाळ झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना पोलिसांकडे केली. परस्पर विरोधी फि र्यादी दाखल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. निकालानंतर या निवडणुकीला गालबोट लागले.