Breaking News

पंचमुखी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

नाशिक, दि. 21 - पंचवटीतील पंचमुखी हनुमान देवस्थान येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 5.30 वाजता महाअभिषेक, सूर्योदयाचे वेळी हनुमान जन्मोत्सव सोहळा, महाआरती, 108 वेळा हनुमान चालिसाचे सामुहिक पठण, सुंदरकांड हवन, महाआरती आणि त्यानंतर लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी पुष्पांजली, महिला मंडळाच्यावतीने संगीतमय सुंदरपाठ हा कार्यक्रम होणार आहे. या संपुर्ण पंचमुखी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन महंत श्री. भक्तीचरणदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुलसीदास त्यागी महाराज व संपुर्ण हनुमान मंदिर भक्त मंडळ प्रयत्नशील आहेत.