Breaking News

भद्रा मारुती दर्शनाहून परतत असताना अपघात

। अपघातात व्यापारी संजय भळगट यांचा मृत्यू  । अपघातातील इतर चौघेजण जखमी 

अहमदनगर, दि. 23 - हनुमान जयंतीनिमित्त औरंगाबाद जवळील भद्रा मारुतीचे दर्शन घेवून परतणार्‍या नगरच्या भाविकांच्या टाटा इंडिगो मांझा (एम.एच.16 एजे.7879) कारला कायगाव टोका (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) जवळ शुक्रवा
री दि.22 रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात नगरमधील किरणा दुकानदार संजय उर्फ रमणलाला झुंबरलाला भटगट (वय 47) हे ठार झाले तर कारमधील अन्य चौघेजण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या वेरुळ लेण्यांच्या जवळच भद्रा माती देवस्थान आहे. निद्रीस्त अवस्थेतील मारुतीच्या मुर्तीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक तेथे जात असतात. शुक्रवारी दि.22 रोजी हनुमान जयंती असल्याने नगर शहरातील चितळेरोडवरील दिलीप सॅण्डविचचे दिलीप शिंदे, फुटाणे गल्लीतील सुंदरलाल तेलवाले फर्मचे राजेश सुंदलाल राठोड, शेरकर गल्ली, तेलीखुंट येथील किराणा दुकाणदार संजय उर्फ रमणलाल भटगट , श्री रोकडे तसेच पुणे येथील त्यांचे मित्र शामभैय्या (दोघाचे पुर्ण नाव समजले नाही) हे 5 मित्र गुरुवारी दि.21 रोजी रात्री राजेश राठोड यांच्या इंडीगो मांझा कारने औरंगाबादला गेले होते. शुक्रवारी दि.22 रोजी पहाटेच या सर्वांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेवून ते नगरकडे रवाना होत होते. कायगाव टोकाजवळ आले असताना  त्यांच्या कारला मालट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकचा कारला धक्का बसून ती रस्ता दुभाजकावर आदळून पलटली. सकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. कारमधील सर्वजण अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नेवासा येथील ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. अपघातात संयज उर्फ रमणलाल भळगट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याने वैदयकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अन्य दोन जखमी राजेश राठोड व दिलीप शिंदे यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. रोकडे व शामभैय्या हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपयार करुन सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
भटगट यांच्या मृतदेहाचे नेवासा ग्रामीण रुगणायातच शवविच्छेदण करण्यात आले.
मयत भळगट हे तेलीखुंट परिसरात फेरीवाले भळगट म्हणून   परितीत होते. त्यांच्या अपघाती मृत्यून शहरात शोककळा पसरली. त्याच्या पश्‍चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी गंगापूर (जि.औरंगाबाद) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.