Breaking News

ताठे यांना डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

पाथर्डी, दि. 20 - वृध्देश्‍वर कारखाना (ता. पाथर्डी) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बी.आर. ताठे यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ज़ेज़ुरी (पुणे) येथील शरद पवार सभागृहात रविवारी प्रदान करण्यात आ
ला.
सिनेअभिनेत्री आदिती कर्नाटकी, सिनेअभिनेते उत्तम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती योजनाताई पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मापत्र देऊन ताठे यांचा गौरव करण्यात आला.
सदीप खेडकर, शिवनाथ मदने, वामनराव गायकवाड, आदींच्या त्रिसदरयीय निवड समितीने सार्वात्रिक कौशल्य निकषांना अनसरून हे पुरस्कार ठरविले होते. चितळी (ता. पाथर्डी) येथील उपसरपंच प्रा. अशोक ताठे, ग्रा.पं. सदस्य अर्जुन साळवे, छायाचित्रकार मदन म्हस्के, आदी पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित होते. आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे, माजी आमदार राजीव राजळे, आ. मोनिका राजळे, आदींसह परिसरातील मान्यवरांनी पुरस्काराबद्दल ताठे यांचे अभिनंदन केले आहे.