सामुहिक विवाह सोहळ्यास 25 लाखापर्यंत मदत करणार! ः ना.एकनाथराव खडसे
बुलडाणा, दि. 19 - बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असून, दुष्काळात खचून न जाता दुष्काळाचा सामना करा, आत्महत्या हा उपाय नसून, प्रत्येक दुष्काळग्रस्त जिल्ह्यात मोठय प्रमाणात सामूहिक विवाह आयोजित करा, त्यासाठी शासनाच्यावतीने 25 लाखांपर्यंत मदत करणार, असे आश्वासन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व कृषिमंत्री ना. एकनाथ खडसे यांनी दिले.
दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयात भाजपा युवा नेते तथा जि.प. सदस्य विनोद वाघ मित्रमंडळाच्यावतीने 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या विवाह
सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या विवाह सोहळ्यात हिंदू धर्मीय 11 व 10 बुद्ध समाज वधू-वरांचा समावेश होता. प्रत्येक समाजाच्यावतीने त्या धर्मानुसार विवाह सोहळा पार पडला. ना.खडसे पुढे बोलताना म्हणाले, की मुलीचे लग्न करण्यासाठी शेतकर्याजवळ पैसा नाही. विवाह जुळत नाही, ही चिंता सतावत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर येऊन वधू-वरांचे विवाह जुळवावे, सामूहिक विवाह घडवून आणावे, त्यासाठी शासन मदत करायला तयार आहे. विनोद वाघ यांनी हा सामूहिक विवाह सोहळा घडून आणला. ती एक शेतकर्यांना मोठी मदतच झाली. त्यानंतर घरकुलासाठी दारिद्रय्रेषेची अट शिथिल करून बेघरांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर म्हणाले, की शेतकर्यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्याला कलंक लागला आहे. शेतकर्यांवर कर्जापेक्षा त्यांचे जिल्हा सहकारी बँकेत डिपॉझीट जास्त आहे. सामूहिक विवाह चळवळ ही सामाजिक चळवळ म्हणून प्रत्येकांनी समोर आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या सोहळ्याला आ.डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, मंत्रालयातील उपसचिव सिद्धार्थ खरात, काँग्रेस नेते देवानंद कायंदे, रमेश कायंदे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्ल्याळ, तहसीलदार राजेंद्र सुरळकर, अभिनेत्री प्रितम कांगणे, साक्षी आंधळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, कार्याध्यक्ष सुधीर चेके पाटील, शिवाजीराव नवघरे, हरी मोरे, हभप सानप गुरुजी, वाघ गुरुजी, नाथा दराडे, शे. गफुर पटेल, सरस्वती वाघ, विठ्ठलराव इलग आदी हजर होते.
दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयात भाजपा युवा नेते तथा जि.प. सदस्य विनोद वाघ मित्रमंडळाच्यावतीने 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या विवाह
![]() |
| Add caption |
