भक्ती चळवळीला ब्राह्मणांचा विरोध
भारतात साधारणत: बाराव्या शतकापासून भक्ती चळवळ जन्माला आली. भक्ती चळवळ म्हणजे संत चळवळ हे वेगळे सांगायला नको. संत चळवळीचा भारतातील प्रारंभ आणि बौद्ध धर्माचा भारतातून लोप या दोन्ही गोष्टी एकाच कालावधीत घडतात यात काही कार्य-कारणभाव आहे काय, हे तपासणे हे जास्त महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आपणास जे पुरावे मिळतात त्यात ब्राह्मण समुदायातील इतिहासतज्ञांचा पुरावा अधिक महत्त्वाचा ठरतो. संत चळवळीला ब्राह्मण समुदााने विरोध केला. परंतु ब्राह्मणेत्तर
जाती समुहातून संत पुढे येत राहिले संत परंपरेची चळवळ महाराष्ट्रातील शिंपी या जातीत जन्मलेल्या संत नामदेव यांनी बाराव्या शतकात निर्माण केली. पुढे ब्राह्मणेत्तर हिंदू जातीतील अनेक संत पुढे आले. ब्राह्मणातूनही संत ज्ञानेश्वर पुढे आले. कारण त्यांनाही ब्राह्मण जातीने बहिष्कृत केले होते. परंतु या चळवळीची परंपरा उत्तरेतील संत कबीर, संत रविदास, यांच्या पासून महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत सावता, संत जगनाडे, संत चोखामेळा, संत कर्ममेळा, संत गोरोबा, त्याचप्रमाणे दक्षिण भारतात अळवार आणि नायनार या जाती सामुहातील संतानी भक्ती चळवळीचा पाया घातला. ही भक्ती चळवळ म्हणजे अध्यात्मिक व धार्मिक त्याचप्रमाणे सामाजिक समता निर्माण करण्यासाठीची विद्रोही चळवळ होती. या चळवळीला ब्राह्मणांचा विरोध होता. तो यामुळे की ही चळवळ समतेची चळवळ होती. भारतीय समाजात ब्राह्मणी धर्माला विरोध करणारी ही चळवळ होती. त्यामुळेच सातवळेकर नावाचे वेद अभ्यासक संत चळवळीला बुद्ध विचारांची चळवळ म्हणतात. त्याच्यामते ‘संत चळवळीने देवाच्या नामाचा वापर केला असला तरी ती मुळत: बुद्ध विचारसरणीवर आधारलेली चळवळ होती.’ दक्षिणेतील नायनार समुहातील 62 संतांमध्ये स्त्रीया व पूर्वाश्रमीचे अस्पृश्य यांचाही समावेश होता. परंतु यात मुख्यत: हिंदू बहुजन जातींचे संत अधिक होते. ब्राह्मणांना ही चळवळ आपल्या व्यवस्थेविरूद्ध संकट वाटली म्हणून त्यांनी ‘मानवता’ आणि ‘समतावादी’ संताचा ‘निकाल’ वेगवेगळ्या पद्धतीने लावला. ‘ब्राह्मण रक्षणाय’ या एकाच विचाराने ब्राह्मणी धर्म पछाडलेला आहे. त्याने त्यासाठी अनेक षड्यंत्रे रचल्याचा दाखला इतिहासातून मिळतो. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वाधिक सर्वाधिक लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भक्तीचळवळ किंवा संत चळवळीचा संस्कार झालेला होता. त्यामुळे त्यांचे विचार आणि राज्य पद्धती या दोन्हीही समतेवर आधारलेल्या होत्या. समता नावाची ब्राह्मणी धर्माला कायम अॅलर्जी राहिली आहे. त्यामुळेच समतावादी तंत्राचा अवलंब करणार्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी ब्राह्मणी धर्माविरूद्ध बंड केले. परंतु हे बंड सामान्य जनतेच्या निदर्शनास येवू नये, यासाठी ब्राह्मणी धर्माने अनेक षड्यंत्र केली. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी छळकपट करण्यात आले. यातूनच महाराष्ट्रात पेशवाईचा उदय झाला. पेशवाई संदर्भात वि. का. राजवाडे यांनी दिलेले दाखले हे सांमती भोगवादाचे आहेत. हे रंगमहालात घडणार्या घागर-चोळीच्या खेळातून ते स्पष्ट करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था ही संतचळवळीच्या समता या अधिष्ठानावर उभी होती. सर्वच संत हे हिंदू बहुजन समाजातील होते. त्यांच्यासमोर मुख्य आव्हान होते ते म्हणजे ब्राह्मणी धर्माच्या गुलामीतून मुक्त होण्याचे. त्या जागी समतेचे अधिष्ठान स्थापन करण्याचे. संतांनी व्यवस्था बदलाविण्याचे विचार व तत्त्वज्ञान आपल्या अभंग वा दोह्यातून सतत मांडले. त्यांनी ब्राह्मणी धर्माच्या धार्मिक सत्तेविरूद्ध मत मांडले. आक्रोश केला. पण तत्कालिन जनतेला या विद्रोहाचे आकलन झाले नाही. त्यांनी सांमतशाही विरोधातही आपला आवाज बुलंद केला. जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी त्यांनी संत चळवळीचे वैचारिक अधिष्ठान शक्तीशाली केले. परंतु अनेक षड्यंत्र करणारा ब्राह्मणी धर्म मात्र आपले अनुभव पणाला लावून जनतेत संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी होत राहीला. ब्राह्मणी धर्माचे मुख्य अस्त्र म्हणजे खोट्या गोष्टीतून संभ्रम पसरविणे हेच आहे.