Breaking News

जलयुक्त बंधार्‍यांमुळे जलस्त्रोताचे बळकटीकरण

पाथर्डी, दि. 23 - तालुक्यात जलयुक्त शिवार याजनेत विविध गांवकुसाला पन्नास बंधारे झाले आहेत. यावर्षी ही या योजनेत एकेचाळीस गावे समाविष्ट झाली आहेत. या मधुन अप्रत्यक्ष सिंचनासाठीच्या जलस्त्रोताचे मोठ्या प्रमाणात बळकटीकरण होणार आहे. दुष्काळी गावांसाठी ही मोठी उपलब्धी आहे असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी यावेळी केले.
येळी, चिंचपूर, तिनखडी, इजले मुंगुसवाडे गांव शिवारात जलयुक्तच्या बंधारा कामाचे भुमिपुजन प्रसंगी बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर,  सरपंच दत्तात्रय राठोड,  कमळा कांबळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष निळकंठ आव्हाड, सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनिल अंदुरे आदीसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते.
पुढे बोलताना राजळे म्हणाल्या की, गेल्या 4 वर्षापासुन पर्जन्यमान कमी आहे. अशा परस्थितीत ऊस तोडणी कामगार गांवी परताला आहे. जलभुमीच्या माध्यमातून भविष्यात जलस्त्रोत बळकटीकरणाचे दृष्टीने पुरक म्हणुन तलावातील गाळ काढणे, बंधारा दुरुस्ती अशा कामांना प्राधान्य दिले आहे असे स्पष्ट करुन पुढे त्या म्हणाल्या पाथर्डी तालुक्यातील खेडे स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने विकास करण्याच्या निधीला ना.पंकजा मुंडे यांच्यामुळे झुकते माप मिळत आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी वेळोवेळी मुंडे यांनी आपल्या बरोबर चर्चा केली असून त्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याचे त्यायावेळी म्हणाल्या. यावेळी शांताबाई दराडे, मारुती दराडे, साहेबराव खेडकर, कल्याण खेडकर, बापूराव पठाडे, ज्ञानदेव ढोले, अशोक खरमाटे, आदिसह शेतकरी व ग्रामस्थ यावेळी मोठ्य संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्रदिप पाटील यांनी केले तर आभार  पोपट खेडकर यांनी मानले.