लासलगावच्या ऋषिकेश कोल्हेला मुख्यमंत्री शिष्यवृत्ती
नाशिक, दि. 18 - येथील महाविद्यालयातील ऋषिकेश कोल्हे या एनसीसी छात्राला मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्राप्त झाली. संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते ऋषिकेशला दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, एनसीसी प्रमुख प्रा. मेजर जालिंदर बगाडे उपस्थित होते. ही शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल सात महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल चित्ते, प्रशासकीय अधिकारी कर्नल प्रवीण निकम, बटालियनचे सर्व आर्मी ऑफिसर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचार्यांनी त्याचे अभिनंदन केले.
