Breaking News

नायगांव, डोंगरगांव ग्रा.पं.वर काँग्रेस विजयी

विकासासाठी एकदिलाने काम कराः आ. बोंद्रे

चिखली, दि. 21 - चिखली तालुक्यात नुकत्याच नव्याने मान्यता मिळालेल्या नायगाव व डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्र
सेचे शिलेदार विजयी झाले असून दोन्ही ग्रामपंचायतवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. ग्रा. सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलतांना आमदार राहल बोंद्रे यांनी गावाच्या विकासाठी सर्वांनी एकदिलाने काम करून गावाचा सर्वांगिण विकासा साधावा, तसेच गावक-यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी गावाला आदर्श गावाचा लौकिक मिळवून एक आदर्श उभा करा असा संदेश देत नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अजबराव देशमुख, समाधान गिते, जिवन गिते, रामेश्‍वर दांदडे, डिगांबर दांदडे, गुलाबराव दांदडे, अभिमन्यु दांदडे, आबाराव दांदडे, खुशालराव दांदडे, विजय वाळोकर, भागवत लहाने, बबन निंबाळकर, आनंदा सोनटक्के, रविंद्र सोनटक्के, सिध्दार्थ अवसरमोल यांच्या मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
नायगाव ग्रामपंचायत मध्ये काँग्रसेचे सात पैकी सहा तर डोंगरगाव ग्रामपंचायतवर सात पैकी पाच शिलेदार विजयी झाले आहेत. या दोनही ग्रामपंचायतवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून नवनिर्वाचित सदस्यांचा चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोंदे्र यांनी सत्कार केला. यावेळी बोलतांना नायगाव व डोंगरगाव ग्रामपंचायतींवर मिळालेला विजय मोठा आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करून गावाला आदर्श गाव करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून गावाला नौकीक मिळवून देण्याचे काम नवनिर्वाचित सदस्यांनी करावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित सदस्य ज्योती समाधान गिते, नलिनी विनोदराव देशमुख, हिराबाई समाधान गुजंकर, सुशिला रामराव गायकवाड, रामेश्‍वर अमुता नाटेकर, मायावती पुरूषोत्तम काळे, कमल अशोक निंबाळकर, सुषमा पांडुरंग दांदडे, गंगासागर विठठल आटोळे, उषा संजय सोनटकके यांच्यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.