पिसाळलेल्या कुत्र्याचा 4 व्यक्तींसह 2 जनावरांना चावा
बुलडाणा, दि. 21 - 18 एप्रिल मध्यरात्रीचे सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. यावेळी सदर कुत्र्याने घराबाहेर झोपलेल्या चार जणासह दोन जनावरांना चावा घेतला आहे. या घटनेत चारही जण ज
खमी झाले असून त्यांना उपचारार्थ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे ग्रामिण भागातील असंख्य नागरिक घरात न झोपता घराबाहेर झोपत आहेत. दरम्यान काल मध्यरात्रीचे सुमारास डोंगर शेवली येथे एका पिसाळ कुत्र्याने प्रवेश केला. यावेळी सदर कुत्र्याने घराबाहेर झोपलेल्या शेख रज्जाक शेख अब्बास वय 70, काबेरुनबी शेख हबीब वय 50, विमल हिवाळे वय 45 व बाबुराव म्हस्के या चार जणांना जबर चावा घेतला. विशेष म्हणजे या कुत्र्याने शेख रज्जाक यांच्या तोंडाला चावा घेतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर या कुत्र्याने आपल मोर्चा जनावरांच्या गोठ्या कडे वळविला. यावेळी सदर कुत्र्याने शे. युसूफ शे. फरीद यांच्या गोर्ह्याला व शे. रऊफ शे. कदीर यांच्या म्हशीला चावा घेवून जखमी केले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जणांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.