डेप्टी सिईओ यादव यांच्या कार्यालयाची तोडफोड
बुलडाणा, दि. 19 - एक वर्षापासून प्रलंबित बिल काढण्यासाठी वारंवार चकरा करुन थकलेल्या महिलेने आज अखेर रुद्र अवतार धारण करीत चक्क डेप्टी सिईओ यादव यांच्या कार्यालयात येवून तोडफोड केली. यावेळी संबंधीत अधिकारी व कर्मचारी ऑफीसमध्ये हजर नसल्यामुळे नेमके प्रकरण काय आहे या बाबात ऑफीस कर्मचार्यांचा गोंधळ उडाला. कार्यालयातील संगणकाचे तोडफोड केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करा अशी सुचना जिल्हा परिषदेच्या सिईओ दिपा मुधोळ यांनी संबंधीत विभागाला केल्याचे कळते. परंतू सायंकाळी उशिरा पर्यंत याबाबत बुलडाणा पोस्टेला तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
निर्मल भारत अभियानाअंतर्गत शेलापूर ख्ाुर्द ग्रामपंचायतमध्ये घनकचरा
व सांडपाण्याचे 80 टक्के काम पुर्ण झाले आहे. परंतु 1 वर्षापासुन या कामाचा उर्वरीत 40 टक्के निधी देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. असा आरोप रेखाबाई सुरडकर यांनी केला आहे. सदर निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयाचे उंबरठे त्यांनी झिजविले. एवढेच नव्हेतर सोन्याची पोत गहाण ठेव्ाुन सरपंचाला 35 हजार दिले. परंतु अद्यापही निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मोताळा येथील या महिलेने जिल्हा परिषदेत जाव्ाुन ग्रामीण पुरवठा कार्यालयाची तोडफोड केली. महिलेचा रुद्रावतार पाहुन अधिकारी व कर्मचारी थक्क झाले.
मोताळा तालुक्यातील शेलापूर ख्ाुर्द येथील ग्रामपंचायती अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा ठेका अग्रवाल यांनी घेतला होता. हे काम भिमराव सुरडकर यांनी केलेे. रेखाबाई सुरडकर यांचा भिमराव हा मुलगा आहे. 40 टक्के कामाचा पहिला हप्ता 7 लाख 98 हजार 540 रुपयाचा प्राप्त झाला. तर एक वर्षापुर्वीच 80 टक्के काम पुर्ण करण्यात आले. परंतु उर्वरित 40 टक्के निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. काही महिण्यापुर्वीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने त्रुट्यापुर्ण करण्याचे पत्र दिले होते. त्यावर ग्रामसेवकाने सर्व त्रुट्या पुर्ण केल्याचे पत्र सांधीत विभागात दिले. असे रेखाबाई सुरडकर यांचे म्हणणे आहे. असतांना देखील उर्वरित 40 टक्के निधी अद्यापही देण्यात आला नाही. बँकेचे 5 लाख रुपये कर्ज काढुन भिमराव सुरडकरने या कामात गुंतविले. शिवाय दुसरा हप्ता मिळेल या आशेने भिमरावची आई रेखा सुरडकर यांनी सोन्याची पोत गहान ठेव्ाुन 35 हजार रुपये दिले. तरिसुध्दा स्वच्छता प्रमुख डांगे यांनी थकीत निधीचे बिल काढले नाही. असा आरोप सदर महिलेचा आहे. दरम्यान आज रेखा सुरडकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयात जाव्ाुन उर्वरित 40 टक्के निधीची विचारणा केली असता सदर कामामध्ये त्रुट्या असयामुळे निधी देता येत नाही. असे सांगुन त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या रेखा सुरडकर या महिलेने चक्क कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. महिलेचा रुद्रावतार पाहुन तिला रोखण्यास एकही कर्मचारी धजावला नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.