नगर तालुक्यातील रस्ते दर्जेदार करणार ः आ.जगताप
श्रीगोंदा, दि. 20 - श्रीगोंदा-नगर तालुक्यातील सर्व मतदारांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकुन मला विधानसभा निवडणुकीत निवडून दिले याची जाण मला आहे. त्यामुळे श्रीगोंदा-नगर तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळवून देवून तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणार आहे. रस्त्यांच्या बाबतीत तालुक्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. गेल्या 35 व
र्षातील अनुशेष भरुन काढून श्रीगोंदा-नगर तालुक्यातील रस्ते दर्जेदार करणार असे आमदार राहुल जगताप यांनी पिंपळगाव पिसा येथील मांडगेमळा ते तुकाईमळा या रिंगरोडच्या कामाच्या भुमीपुजनावेळी सांगितले. या रस्त्याच्या कामाचे आज उद्घाटन झाले. या रस्त्यासाठी 60.00 लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आलेला असून यामधून खडीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी आमदार राहुल जगताप यांच्या समवेत पिंपळगाव पिसाचे सरपंच सुर्यजीत पवार, प्रमोद जगताप, एकनाथ खामकर, आण्णासाहेब सातपुते, रामदास गुरुजी, कल्याण जगताप, सचिन भोसले, बंडोपंत धारकर, गोरख पाडळे, उपसरपंच संभाजी खरात, उमेश जगताप, पंढरीनाथ कदम, अजिंक्य जगताप, किरण भालके, दत्तु इथापे, सुरेश भापकर, रामदास कुताळ, वसंत शिंदे, सोपान पंदरकर, नाथाभाऊ शेंडगे, तसेच आमदार राहुल जगताप मित्र परिवाराचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.