माण तालुक्यात लोकसहभागातून खोदलेल्या विहिरीचे लोकार्पण
सातारा, दि. 20 - माण तालुक्यातील वावरहिरे येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत व लोकसहभाग व लोकवर्गणीतून खोदलेल्या विहिरीचे व
पाईपलाईनचे उद्घाटन सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकसहभागातून काढलेल्या गाव विहीर व टंचाई निधी यायला वेळ लागणार या कारणाने गावातील लोकांनी आपल्याकडील सोने गहाण ठेवून त्याद्वारे पाईपलाईनचे काम पूर्ण केले. यासाठी गावात सिनेअभिनेते सयाजी शिंदे व आलेल्या मान्यवरांचे बैलगाडीतून गावातून गजीनृत्याच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी विभागीय सचिव प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, पाण्यासाठी अनेकजण बोअर, विहीर घेत असतात; परंतु परिसरातील पाणी खालावलेली असल्याने विहिरी तसेच बोअरवेलला पाणी लागत नाही. मात्र वावरहिरेच्या पुण्याईमुळे काही फुटांवर पाणी लागले. गावच्या कामात तरुणवर्गाने एकत्र येऊन गावचा विकास साधावा. शेतातील माहिती शेतकर्यांकडून घ्यावी. कारण त्यांच्या इतका मोठा कोणीच नाही. गावाची एकी असेल तर प्रशासन नक्कीच पाठीशी उभे राहते.
तहसीलदार माने, राजेश जानकर, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे ए. जी. डोंगळे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, डॉ. माधवराव पोळ, डॉ. महेश गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच विलास चव्हाण व सदस्य पदाधिकारी तसेच गावातील वसंत पांढरे, वसंत भोसले, अजित मोदी, दिगंबर चव्हाण, लखन खुस्पे, हनुमंत अवघडे, सुधीर जाधव उपस्थित होते. संजय भोसले यांनी सूत्रसंचालन केले. उमेश पांढरे यांनी आभार मानले.