हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलन : तृप्ती देसाईं
मुंबई, दि. 21 - शशनिशिंगणापूर आणि कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी आता हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचे बुधवारी पत्रकारपरिषदेत जाहीर केले आहे. मंदिर प्रवेशानंतर महिलांना आता मस्जिद प्रवेश मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई आंदोल
न करणार आहेत.
यासाठी ‘हाजी अली सबके लिए‘ फोरमची स्थापना केली आहे. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी ट्रस्टींसोबत चर्चा केली जाणार आहे. जर महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश मिळाला नाही तर 28 एप्रिल रोजी हाजी अली सबके लिए फोरम धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या आधी हाजी अली दर्गाहच्या ट्रस्टींसोबत चर्चा करण्याचीही हाजी अली सबके लिए फोरमची तयारी असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील काही सेक्युलर संस्था व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन या फोरमची स्थापना केली आहे. या फोरमच्या माध्यमातून महिलांना सर्व धार्मिक स्थळांवर पुरूषांप्रमाणेच समान अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.