Breaking News

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 113 जणांकडून बलात्कार

पुणे, दि. 18 -  16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर देान वर्षात 113 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलीने केलेल्या तक्रारीत बलात्कार करणार्‍यांमध्ये पोलिसांचादेखील समावेश असल्याची माहिती दिली आहे.

पिडीत मुलगी पश्‍चिम बंगालची राहणारी असून, नोकरीचे अमिष दाखवून तिला पुण्यात आणण्यात आले होते. मात्र पुण्यात आणल्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. विशेष म्हणजे हे प्रकरण दिल्लीमधील मॉडेल रेपप्रकरणाशी संबंधित आहे. पिडीत मुलीने आपली स्वत: सुटका करुन घेतली आणि दिल्लीला पळून गेल्यानंतर, तिने दिल्लीमध्ये पोलीस तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ही केस पुणे पोलिसांकडे वर्ग केली असून,113 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला अटकदेखील केली आहे, तर चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी अजून 4 आरोपींना अटक केली आहे.
विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचे नाव स्विक्रिती खरेल असून ती नेपाळची नागरिक आहे. चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रोहीत भंडारी, हरिश शाहा, तपेंद्र साही आणि रमेश ठकुला असे असून सर्वजण नेपाळचे नागरिक आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील चंदन नगरमध्ये राहायचे. तक्रारीत देण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये शक्ती, अण्णा, भारत यांचादेखील समावेश आहे. हे सेक्स रॅकेट चालवण्यात या सर्वांचा सहभाग होता.