Breaking News

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

अंबड, 18 - तालुक्यातील झिरपी येथील तलाठ्यास 900 रूपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले.
झिरपी येथील एका शेतकर्‍याची गट क्रमांक चारमध्ये 8 हेक्टर 49 आर जमीन आहे. संबंधित शेतकर्‍यास सातबारा उतार्‍यावर विहिरीची नोंद घ्यावयाची होती. यासाठी तलाठी तमशेटे यांनी बाराशे रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 900 रूपये देण्याचे तलाठ्याने सांगितले. मात्र, शेतकर्‍याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी दुपारी सापळा लावण्यात आला. नूतन वसाहत भागातील कामकाजाच्या खोलीत लाच घेतल्याचे निष्पन्न झाले.