Breaking News

पांडेजी ! मराठान मे जोर है।... देखना है? बहुजनांचे शील आग्र्‍याचा पेठा नव्हे...!


‘आमच्या माँ साहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही किती सुंदर जन्माला आलो असतो,’ सुभेदाराच्या सुनेला उद्देशुन राजे छत्रपतींनी काढलेले हे उद्गार... मुघल आक्रमकच नव्हे तर स्वसरदारांनीही स्त्रीला बेइज्जत केले तर त्यांचा कडेलोट करण्याची सजा फर्मावणारे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज....  आज त्यांच्याच स्वराज्याच्या मातीला महिलेच्या इभ्रतीचे दिवसाढवळ्या धिंडवडे निघत असतांना महाराजांचा वारसा सांगणारे सर्वच कथित शुर सरदार हातात बांगड्या आणि ुुु शेपुट घालून परप्रांतियांना बहुजनांवर खुला बलात्कार करण्याचे आवतन देतांना दिसत आहेत. देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हिंदू बहुजनांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येईल असी भिती व्यक्त केली जात होती. याची प्रचिती पुन्हा एकदा गणेश पांडे प्रकरणातून आली आहे.
या देशातील दीन दलीत ओबीसी सुरक्षित नाही हे अलिकडच्या दोन वर्षात घडलेल्या विविध घटनांमधून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. आता तर अन्याय अत्याचाराचा कळस झाला आहे. आमच्या माता भगिनी देखील 21 व्या शतकातील पेशवाईत सुरक्षित नसल्याचे दाखले पांडे-पुंडेंच्या वर्तनातुन मिळत आहेत. या महाराष्ट्राने ज्याला पोटात घेतले, पोटच्या पोराप्रमाणे मायेची उब दिली, त्या परप्रांतीयांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवरच बलात्कार केल्याच्या घटना नवीन नाहीत. अस्मितेवर परप्रांतीयांकडून सातत्याने होत असलेल्या याच बलात्काराचे भांडवल करून ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राला वेठीस धरले. मराठ-महाराष्ट्राची अस्मिता असा जप करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आणि जेव्हा प्रत्यक्षात आमच्या माता भगिनींच्या पदराला हात घालणार्‍या राक्षसी प्रवृत्तींचा वध करण्याची वेळ आली तेंव्हा हिंमत मात्र दाखविली नाही. शिवसेना मनसे आणि भाजपमध्ये असलेले सारेच मर्दमराठे षंड बनले आहेत, केवळ तेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील राजकारणातीत मुद्दा म्हणून गणेश पांडे या प्रकरणाकडे पाहण्याची नैतिकता उरली नाही. कोण कुठला बोकड दाढीवाला गणेश पांडे मुंबईत येतो, महाराष्ट्राच्या जीवावर मोठा होतो. भाजपचे युवा अध्यक्षपद मिळवतो आणि आमच्याच भगिनीच्या इज्जतीला आव्हान देतो. बोकड्या, माजलेल्या भाषेत म्हणतो - ‘इस मराठन मे बहुत जोर है, इधर इतना है तो बेड मे कितना होगा!’ बोकड्या पांडे अगदी खरं बोलला पण त्याला अर्धसत्य उमजलं आहे हे पांडेला अनुभवातून कळेलच. आमच्या माता भगिनींच्या मनगटातही जोर आहे. कुणावर अत्याचार करण्याइतका जोर नसला तरी स्वतःच्या इभ्रतीचे संरक्षण करण्याच सामर्थ्य नक्कीच आहे. बेडपर्यंत जाण्याची नराधमी भाषा करशील तर बेडवर लिंग छाटण्याची ताकद या सुसंस्कृत मराठा बहुजनांमध्ये आहे.
बहुजनांनो! तो पांडे तर निर्लज्ज आहे त्याचे जाऊ द्या पण तुम्ही आम्ही खरोखर षंड आहोत का? एका सामान्य कुटूंबातील महिला आपल्या कुवतीप्रमाणे समाजकारणात -राजकारणात उभी आहे. तिच्यावर पांडे नावाचा कुत्रा अन्याय अत्याचाराच्या नावाने भुंकतो आहे आणि आपण षंडासारखे माना खाली घालून बसतो आहोत? राजकारण्यांचे सोडा त्यांना असली प्रकरणं चघळायला हवीच आहेत. त्यावरच त्यांचे राजकारण धुमसत ठेवता येणार आहे. नैतिकतेचा टेंभा मिरविणारा भाजप यात ठाम भुमिका घेऊन कारवाई करील याची शक्यता अगदीच धुसर आहे. शिवसेना-मनसेलाही काही देणघेणं दिसत नाही. उरला प्रश्‍न काँग्रेस-राष्ट्रवादीचा तर त्यांचेच हात दगडाखाली आहेत. ते सोडविण्यातच त्यांची उर्जा खर्ची पडत आहे. मग तुमच्या आमच्या बहुजन माता भगिनींची इभ्रत वाचविण्यासाठी आपल्यालाच आता तयारी करावी लागणार आहे.
(ता.क. सदर युवतीने आ. आशिष शेलार यांना पाठविलेले पत्र लोकमंथनला प्राप्त झाले आहे. ते जसेच्या तसे प्रसिध्द करीत आहोत