दक्षता पथकाकडून पोलीसांवरील हल्याचा निषेध
बुलडाणा (प्रतिनिधी), 04 - मुंबई येथील महिला वाहतूक पोलिस व लातूर येथे पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध पोलिस दक्षता पथक, बुलडाणा यांच्याकडून करण्यात आला. याबाबत दक्षता समितीने एक पत्रक काढले असून वरील घटणांना निषेध केला आहे.
निवेदनात नमुद आहे की, दि.26 फेब्रुवारी रोजी एक महिला वाहतूक पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतांना शशिकांत कालगूडे नामक व्यक्तीने सदर कर्मचारी महिलेला मारहाण केली. या अगोदर लातूर जिल्ह्यातील पानगांव येथेही पोलिसांना मारहाण झालेली आहे. सदर घटनेचा पोलिस दक्षत पथकाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करुन अशा प्रकारच्या पोलिसांना मारहाण होणार्या घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी शासन स्तरावरुन उपाययोजना करण्यात यावी जेणे करुन सामान्य जनतेला सुरक्षा देतांना पोलिस हे आपले कर्तव्य निर्भयपणे बजावतील.निवेदनावर प्रभाकर वाघमारे, ना.है.पठाण, सौ.ए.बी.परांजपे, अॅड.किरण प्र.राठोड, प्रशांत सोनुने आदिंच्या सह्या आहेत.