पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पालघर, 30 - बोईसरमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून तिच्या दीड वर्षांच्या भावाच्या डोक्यावर वार करण्यात आले आहेत. बोईसर दांडी पाडामध्ये हा पहाटेच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. या घटनेत दोन्ही मुलं गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलांना उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
इतकंच नाही तर मुलाचं लिंग कापून आरोपी फरार झाला आहे.
या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पालघरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी जी यशोद, उपपोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्त्वात एक विशेष पथकाची स्थापना केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.