सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 03 - मंत्री आणि सरकारी कर्मचार्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) पद भुषविण्यापासून रोखणारी शिफारस करणार्या लोढा समितीच्या अहवालावर आक्षेप घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले आहे.
बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण कठीण असल्याचं सांगितल गेलं आहे. 18 मार्चला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
मंत्री बीसीसीआयमध्ये घेण्यासाठी तुम्ही इतके उत्सुक का आहात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला विचारला आहे. कॅगला देण्यात येणा-या मतदान हक्कावरही बीसीसीआयने आक्षेप घेत कॅगला फक्त सल्लागाराची भुमिका देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला करोडो रुपयांचा व्यवहार करण्यासाठी मोकळीक हवी आहे का ? असा सवाल विचारला आहे. यावर बीसीआयने कॅगची नियुक्ती केल्यास आयसीसी यावर आक्षेप घेईल असा युक्तिवाद केला. बीसीसीआयने एका राज्यात एकच क्रिकेट असोसिएशन असण्याच्या शिफारशीवरदेखील आक्षेप घतेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला गेल्या 5 वर्षात कोणत्या राज्याला किती निधी दिला गेला याची माहिती देण्यास सांगितली आहे.