मुख्यमंत्र्यांसह 25 मंत्री आज मराठवाड्याच्या दुष्काळ दौर्यावर
मुंबई, 04 - मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आज मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौर्यावर आहेत.
सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री लातूरला पोहोचतील. त्यानंतर लाबोटा गावाला भेट देतील. इतर मंत्रीही आज ट्रेनने नेमून दिलेल्या तालुक्याच्या दौर्यावर जातील. दुपारी 1 वाजता निलंग्यामध्ये अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली जाणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता सर्व मंत्र्यांची लातूरला आढावा बैठक होणार आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, प्रशासनाने पोहोचवलेल्या सर्व सुविधांचा लाभ शेतकर्यांना मिळतोय का? याचा आढावा मंत्री घेणार आहेत. दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या दुष्काळ दौर्याला कालपासून सुरुवात झाली. कॅबीनेटमधल्या तीन मंत्र्यांनी मराठवाड्यातील 3 दुष्काळग्रस्त तालुक्यांना भेट दिली. तर उर्वरित मंत्री काल रात्री लातूर एक्स्प्रेसने मराठवाड्याच्या दौर्यासाठी रवाना झाले आहेत.