Breaking News

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी चाचण्या

सातारा, 04 - शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील विविध क्रीडा प्रबोधनीत 2016-17 या  वर्षाकरीता नवीन प्रवेश देण्यासाठी 8 ते 14 वर्ष वयोगटातील शालेय शिक्षण घेत असलेल्या व नसलेल्या मुला व मुलींच्या वजन, उंची, भरधाव धावणे, शटल रन, लांब उडी, उंच उडी, मेडीसीन बॉल थ्रो व लवचिकता या चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी दिली. 
 तालुकास्तर व जिल्हास्तर क्रीडा चाचणी पुढीलप्रमाणे :- जावली तालुक्यात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे दि. 10 मार्च रोजी, खंडाळा तालुक्यात राजेंद्र विद्यालय, खंडाळा द्वारा मार्केट कमिटीचे मैदानावर दि. 9 मार्च रोजी, सातारा तालुक्यात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे 11 मार्च रोजी, पाटण तालुक्यात बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण येथे दि. 11 मार्च रोजी, कोरेगाव तालुक्यात डि. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव येथे दि. 11 मार्च रोजी, माण तालुक्यातील माणदेश चॅम्पीयन क्रीडा संकुल, म्हसवड, ता. माण येथे 11 मार्च रोजी, खटाव तालुक्यात लक्ष्मी नारायन इंग्लिश स्कूल, खटाव  येथे 9 मार्च रोजी, महाबळेश्‍वर तालुक्यात अंजुमन आय इस्लाम पब्लिक स्कूल, पाचगणी, ता. महाबळेश्‍वर येथे दि.11 मार्च रोजी, फलटण तालुक्यात तालुका क्रीडा संकुल, जाधववाडी ता. फलटण येथे दि. 10 मार्च रोजी, वाई तालुक्यात किसन वीर महाविद्यालय, वाई येथे दि. 9 मार्च रोजी, कराड तालुक्यात वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड येथे 9 मार्च रोजी, सातारा जिल्हास्तर श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे 23 मार्च रोजी होणार आहेत. अधिक माहितीसाठी क्रिडा कार्यालयाशी संपर्क साधावा.