Breaking News

रयत शिक्षण संस्थेला सातारा भूषण पुरस्कार जाहीर

सातारा, 04 - रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या सुपुत्रास प्रतिवर्षी सातारा भुषण पुरस्काराने गौरविले जाते. 2015 या पुरस्काराच्या रौप्यमहोत्सवी वर्षासाठी विशेष म्हणून प्रथमच रयत शिक्षण संस्था या संस्थेला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ मंगळवार दि. 8 मार्च 2016 रोजी सायंकाळी 5.30 वा. वाय. सी. कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. रु. 21 हजार व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे हे 25 वे वर्ष आहे. 
गेली 96 वर्षे तळागाळातील विद्यार्थ्यांची ज्ञानदान करत असलेली ही संस्था कर्मवीर अण्णांनी स्थापन करुन असंख्य ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली केली आहे. ती संस्था सातार्‍याचे सर्वांर्थाने भूषण आहे. या वर्षीचा पुरस्कार प्रदान समारंभ ज्येष्ठ विचारवंत व निर्मिड पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संशोधक व उद्योजक डॉ. अशोक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिला जाणार असून तो संस्थेचे वतीने चेअरमन डॉ. अनिल पाटील स्विकारणार आहेत. पुरस्कारासाठीचे आकर्षक सन्मानचिन्ह प. ना. पोतदार व रविंद्र झुटींग यांनी तयार केले असून त्यावर कर्मवीर अण्णा, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांचे फोटो आणि संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष आहे.
 त्यामध्ये आधुनिक शिक्षण भगीरथ पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील गौरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सन 1919 मध्ये स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन ज्ञानगंगेचा प्रवाह तळागाळापर्यंत पोचविला. शतक पुर्तीच्या उंबरठ्यावर असताना आपल्या 700 शाखांमधून प्रतिवर्षी 5 लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणार्‍या रयत शिक्षण संस्थेला सन 2015 चा रौप्य महोत्सवी सातारा भूषण पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात गोडबोले ट्रस्ट काम करत आहे. याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन गोडबोले ट्रस्टचे विश्‍वस्त अरुण गोडबोले, अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले व उदयन गोडबोले यांनी केले आहे.