पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली, 04 - केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांच्या 824 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचा कार्यक्रम आज (शुक्रवार) जाहीर केला. 19 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होती.
या निवडणुकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सुमारे पाऊण लाखांहून अधिक निमलष्करी जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या राज्यांतील एकूण मतदान होणार होणार आहे. पाच विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण 17 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.