आरोपींच्या वकिलांनी नाशिक मनपात 10 लाख रुपये भरावे : प्रवीण गेडाम
धुळे, दि.04 - वेळ वाया घालवणार्या आरोपींच्या वकिलांनी नाशिक मनपात 10 लाख रुपये भरावे, तरच पुढील साक्षीला येईन, असा अर्ज नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी धुळे न्यायालयात केला आहे.
सुरेश जैनसारख्या नेत्यांना तुरुंगाची हवा खायला भाग पाडणार्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात, डॉ. प्रवीण गेडाम तक्रारदार आणि साक्षीदारही आहेत. मात्र या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांकडून चालढकलपणा सुरु असल्याचा आरोप प्रवीण गेडाम यांनी केला आहे. आयुक्तासारख्या महत्त्वाच्या अधिकार्याचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी प्रवीण गेडाम यांनी आरोपींच्या वकिलांकडून दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.