काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींविरुद्ध देशद्रोहाचा खटला
अलाहाबाद, 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध सीजेएम कोर्टात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.
राहुल यांनी शनिवारी जेएनयूमध्ये देशविरोधी घोेषणा देणा-या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. विद्यार्थीशी चर्चा केली होती. कोर्टाने याचिकाकर्त्यांना एक मार्चपर्यंत राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.