वकिलाची कन्हैय्या कुमारला मारहाण; सर्वोच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
नवी दिल्ली, दि. 17 - कन्हैय्या कुमारला सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात असताना वकिलांनी कन्हैय्या कुमारला मारहाण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली आहे.
. या समितीत कपिल सिब्बल, दुष्यंत दवे, हरीन रावल, राजीव धवन यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने समितीला लवकरात लवकर या सर्व प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याअगोदर आज सकाळी न्यायालयाबाहेर वकिलांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती, यादरम्यान फर्स्ट पोस्टचे पत्रकार तारिक अन्वर यांनादेखील मारहाण करण्यात आली. सोमवारी पत्रकारांवर हल्ला करणारे वकिल म्हणाले की, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-यांना हिरो ठरवले जाते आणि आम्हाला गुंड म्हणतात असे घोषणाबाजी करणा-या वकिलाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने पतियाला हाऊस कोर्टात कन्हैयाच्या खटल्याच्या सुनावणीला कन्हैयाच वकिल, कुटुंबिय मित्र यांच्या व्यतिरिक्त वकिलांसह इतरांना
हजर राहण्यास मनाई केली आहे.