भाजपने राष्ट्रभक्तीचे सर्टिफिकेट वाटू नये - राज ठाकरे
मुंबई, 17 - जेएनयूत देशविरोधी घोषणा देणा-यांना फोडून काढा असे सांगत भाजपने राष्ट्रभक्तीचे फुकटची सर्टिफिकेट वाटू नयेत. चारा छावण्या परत सुरु करायच्या होत्या तर त्या बंद कशासाठी केल्या?असा सवालही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मेक इन इंडिया काय प्रकार आहे हे आपल्याला अद्याप समजले नाही. हे सारे राजकारण आहे. मेक इन इंडिया कार्यक्रम दिल्लीत का नाही केला, तो मुंबईतच का घेतला? यामागे भाजपचे शोबाज राजकारण आहे. जेएनयूत भाजपची विद्यार्थी एबीव्हीपी संघटनेचे बस्तान बसविण्यासाठी दिल्लीतील राडा सुरु आहे असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.