Breaking News

देशाविरोधी बोलल्यास शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर

  नवी दिल्ली, 17 -  देशविरोधी कुणी यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये बोलत असो, वा बाहेर बोलत असो, त्याला कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी, असे परखड मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले आहे. 
देशद्रोहाचे कुणी बोलत असेल, देशविरोधी बोलत असेल, तर त्याला कायद्यान्वये शिक्षा मिळायलाच हवी. नसेल शिक्षा द्यायची तर कायदाच काढून टाका आणि देशभरात सांगून टाका की, देशविरोधी काहीही बोलल्यास काहीही कारवाई होणार नाही. शिवाय, काहीही बोलण्याची सूट असल्याची घोषणाच करुन टाका. असे श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले. जगातील कोणत्याही देशात जा, सर्वत्र देशद्रोहासाठी कायदा आहेच आणि देशद्रोहाचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्याला त्यानुसार शिक्षा मिळायलाच हवी, असेही ते म्हणाले. श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले, कायदा ही एक शिस्त आहे,  सामाजिक नियम आहे. स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे.