Breaking News

पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी राऊत

 जामखेड/प्रतिनिधी । 22 - अहमदनगर जिल्हा श्री संत गोरोबा  काका पतसंस्थेचे चेअरमन तथा प्रजापती कुंभार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठलराव (आण्णा) राऊत यांची अहमदनगर  जिल्हा पतसंस्था सहकारी फेङरेशनच्या संचालक पदी सन 2016 ते 2021 या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टि एस भोसले यांनी  काम पाहिले सामाजिक काम करत आसतांना  विठ्ठल राऊत यांची अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी स्वच्छता दुत म्हणूनू निवड करण्यात आली होती विठ्ठल राऊत यांच्या या निवडीबाबत जिल्हा फेडरेशनचे चेअरमन सबाजी गायकवाड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड नगरसेवक शामिरभाई सय्यद व तालुक्यातील सर्व स्तरातील मान्यवरांनी  अभिनंदन केले.
तर कोठारी प्रतिष्ठान जामखेड तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस मित्र संजय कोठारी माजी सरपंच सुनिल कोठारी डॉ सुरेश काशीद प्रविण चोरडिया भाऊराव राळेभात प्रफुल्ल सोळंकी पिंटू बोरा आदी उपस्थित होते.