Breaking News

आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये ’फाऊंडर डे’ उत्साहात

 अहमदनगर/प्रतिनिधी । 22 - अहमदागर शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्राजी माध्यमाच्या विद्यालयात ’फाऊंडर डे’ मोठ्या आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक, प्राचार्य व शैक्षणिक सल्लागार स्व. विलासराव आठरे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेत 15 फेब्रुवारी हा दिवस ’फाऊंडर डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीचा हा ’तिसरा फाऊंडर डे’ होता.
या निमित्त प्राचार्य स्वर्गीय विलासराव आठरे पाटील व माजी खासदार कै. चंद्रभान आठरे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अॅड. विश्‍वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ऋतुजा तरटे व ऋतुजा शिंदे यांनी आपल्या भाषणातून प्राचार्य स्वर्गीय विलासराव आठरे पाटील यांचे जिवनकार्याचे प्रतिपादा केले.
 अ‍ॅड. विश्‍वासराव आठरे यांनी आपल्या भाषणातून स्व. विलासराव आठरे पाटील यांचे शैक्षणिक विचार सांगून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नव्याने उर्जा निर्माण केली. ते म्हणाले, ’’प्राचार्य स्व.विलासराव आठरे पाटील हे आदर्श शिक्षक होते. त्यांनी आपल्या कार्यातून मोठमोठ्या पदांपर्यंत आपले विद्यार्थी पोहचविले. त्यांचा आदर्श डोळ्याासमोर ठेवून शिक्षकांसाठी कार्य करणे गरोचे आहे’’ असे आवाहन केले. कार्यक्रमानंंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व जादूचा कार्यक्रम दाखविण्यात आला. हा कार्यक्रम पाहून मुले भारावून गेली. कार्यक्रमासाठी संस्थेच्या जेष्ठ विश्‍वस्त श्रीमती जनाबाई आठरे, श्रीमती योतीताई पिसुटे, डॉ.प्राचीताई पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय आठरे पा., सौ. मंजुषा आठरे पा. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सुशील खेडकर यांनी केले, सुत्रसंचाला संजय निचित यांनी केले. 

तर आभार पर्यवेक्षक गोरक्षनाथ भोर यांनी व्यक्त केले.