बीएसएनएलचा सातपूरला ग्राहक मेळावा संपन्न
सातपूर/प्रतिनिधी। 01 - ग्राहकांच्या अडचणी दूर करून त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन बीएसएनएलचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती यांनी केले. सातपूर येथील कार्यालयात आयोजित ग्राहक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
ग्राहकांच्या तक्र ारी ऐकून घेतल्यानंतर त्यांनी संवाद साधला. ब्रॉडबँड सेवा, मोबाइल सेवा, उशिरा देण्यात येणारी देयके, काही भागात मिळणारी अखंडित सेवा यांसह विविध तक्र ारींचा पाढा ग्राहकांनी वाचला. निमा सदस्य मनीष रावळ यांनीही औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारी मांडल्या. यावेळी उपमहाप्रबंधक पी. डी. रडे, डी. एन. घरडे, मनीष रावळ आदि उपस्थित होते. याप्रसंगी सहायक प्रबंधक एन. बी. पाटोळे, मंडल अभियंता व्ही. डी. गुंजाळ, आर. पी. पाटील, बी. एम. जाधव, श्याम मंडलिक, ए. एस. बर्वे, करमासे, आदिंसह ग्राहक उपस्थित होते.