बीएसएनएल मनोरा उभारण्याची ठाणगावला मागणी
येवला/प्रतिनिधी। 01 - येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात मोबाइलला पुरेशा प्रमाणात कव्हरेज मिळत नसल्याने भारत संचार निगमने गावात मनोरा उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अधिकारी वर्गांकडे केली आहे.
ठाणगाव या गावात दूरसंचारचे सुमारे 800 कार्डधारक असून, यात शेतकरी कार्डधारकांची संख्या मोठया प्रमाणत आहे; मात्न मोबाइलला पुरेशी रेंज मिळत नसल्याने फोन न लागणे, बोलणे चालू असताना फोनमध्येच बंद पडणे असे प्रकार नित्याचे झाल्याने ग्राहक वैतागले आहेत. परिणामी हे ग्राहक खासगी कँपन्याकडे वळत आहेत. ठाणगावच्या जवळच कानडी, गुजरखेडे, विखरणी पिंपरी ही गावे येत असून, तेथेही असेच प्रकार घडत असल्याने ठाणगाव येथे भारत संचार निगमने मनोरा उभारावा व ग्राहकांची होणारी गैरसोय
दूर करावी, अशी मागणी सरपंच मारुती नेहरे, रामभाऊ शेळके, रवींद्र शेळके, भाऊसाहेब शेळके, गोरख घुसळे, संपत शेळके, कैलास नेहरे, राजेंद्र शेळके, आनंद शेळके, बाबासाहेब विठोबा शेळके, छगन कव्हात, रूंझा भवर, श्याम शेळके, बाळासाहेब ढगे यांच्यासह कानडी गावचे गणपत कांदळकर, कौतिक काळे, गुजरखेडे गावचे धर्मा पारखे, करणा पाटील, आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.