Breaking News

अवकाळी पावसाचा तडाका, शेतीचे मोठे नुकसान

परभणी, 01 - राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळणी पाऊस सुरू असतांना परभणीतही वीजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याचा वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. परभणीत दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  
त्यानंतर रात्री उशिरा पालम, गंगाखेड, पूर्णा आणि मानवत तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस पडला. त्यामुळ आंबा, ज्वारी या पिकांचे मोठ्ठे नुकसान झाले. तर हिंगोलीमध्ये रात्री उशिरा जोराचा पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील कडोळी गोरेगाव येथे गारा पडून कांदा, गहू, हरबरा आणि टाळका ज्वारीच अतोनात नुकसान झाले. औंढा नागनाथ तालुक्यातील माथा परिसरातही बराच वेळ गारांचा पाऊस पडला. कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, सोडेगाव, पांघराशिंदे या गावात गरांसाह पाऊस झाला. वसंत तालुक्यात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील सुमारे 15 गावांना सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍यासह गरपीटीचा जोरदार तडाखा बसला. पारोळा तालुक्यातील कोळपींप्रि, अंबापींप्रि, बहादरपुर, कंकराज, भिलाली, इंद्रापींप्रि, सडावन, रडावन तसेच अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, फाफोरे या गावात गारपीट तर मंगरुळ, शिरुड गावात वादळाचा तडाखा बसला, या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे गहु, हरभरा, कांदा तसच मका पिकांचे मोठे नुकसान झाले.